पतंग मांजाने चक्क नाक कापले

नायलॉन मांजाचा कहर आता खेडोपाडीसुद्धा पसरु लागलाय.. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे मनोहर बाबूराव आरगडे यांचं नाक आणि डोळ्याजवळील भाग नायलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या जखमेवर तब्बल दहा टाके घालण्यात आलेत.  

Updated: Jan 15, 2016, 08:23 AM IST
पतंग मांजाने चक्क नाक कापले title=

येवला : नायलॉन मांजाचा कहर आता खेडोपाडीसुद्धा पसरु लागलाय.. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे मनोहर बाबूराव आरगडे यांचं नाक आणि डोळ्याजवळील भाग नायलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या जखमेवर तब्बल दहा टाके घालण्यात आलेत.  

आरगडे हे मुळचे रहाडीचे रहिवासी आहेत. त्यांचा मित्र समीर शेख याच्यासोबत ते कामानिमित्त वीज वितरण कंपनीच्या अंदरसूल येथील कार्यालयात जात होते. मोटार सायकलवरुन जात असलाना वाटेत त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला आणि वर करताना त्यांच्या नाकाला आणि डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या.

नाशिक शहर परिसरात नायलॉनच्या मांजा वापराला बंदी घालण्यात आलीय, तरीही शहरात काही ठिकाणी सऱ्हास घातक मांज्याची विक्री केली जात असून पतंगसाठी वापर सुरूच आहे. शहरात जर नायलॉन वापराला बंदी आहे तर मांजा येतोच कुठून असा सवाल पक्षी प्रेमी उपस्थित करतायेत.

संक्रांतीदरम्यान दरवर्षी नायलॉनच्या मांज्यात अडकून पक्षांचा जीव जातो.. तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी पक्षी मित्र किंवा अग्निशमनदलाचे जवान स्वताचा जीव धोक्यात घालतात, अनेकदा वाहनचालकांच्या गळ्यात मांजा अडकून इजा होते.. अशा एक ना अनेक घटना दरवर्षी घडत असतात आणि मग सरकारला आठवण येते नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी घालण्याची. असचं घडतय नाशिकमध्ये नायलॉन मांज्यावर बंदी घालत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. 

पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईबाबत पक्षीप्रेमी नाराज आहेत. खरंतरं दिवाळीच्या सुट्टयांपासूनच शहरात पतंग उडवायला सुरुवात होते  शहरात चोरट्या मार्गाने मांजा येतो मात्र पोलिस दुर्लक्ष करत असल्याची पक्षीप्रेमीची तक्रार आहे. मांजा विक्रेत्यांवर कारवाई ऐवजी उत्पादकांवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही उपस्थित केला जातोय.
 
संक्रातीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.  येत्या दोन दिवसात प्रशासनाकडून किती जणांवर कारवाई होणार? नायलॉन मांजा विक्रीला या दोन दिवसात तरी लगाम लागणार का? याकडे नाशिककरांच लक्ष लागल आहे.