कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.
उद्या, (रविवारी) ओवेसी यांची कल्याणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. केडीएमसी पालिका निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे सात उमेदवार उभे आहेत.
दरम्यान, दोन नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे... तर ३ नोव्हेंबरपर्यंत ओवेसी यांना कल्याणमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.