बदलापूर : मुलीची छेड काढली म्हणून बदलापूरमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली गेली.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी बदलापूर पोलिसांत त्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी आरोपीला पकडण्याआधीच, मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी तसंच स्थानिकांनी, या तरुणाला पकडून त्याला बेदम मारलं.
मारहाण केल्यानंतर या तरुणाची नग्न धिंडही काढली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणाला ताब्यात घेतलं. सहा ऑक्टोबरच्या या घटनेचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.