कल्याण-डोंबिवली निवडणुकीत भाजपची प्रचाराची अनोखी शक्कल

निवडणूक म्हटली की मतदारांना आकर्षित करणं आलं.. मग त्यासाठी विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात, आणि आपला पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आपला उमेदवार मतदारां पर्यंत पोहोचवत असतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपनंही प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

Updated: Oct 20, 2015, 12:50 PM IST
कल्याण-डोंबिवली निवडणुकीत  भाजपची प्रचाराची अनोखी शक्कल  title=

कल्याण : निवडणूक म्हटली की मतदारांना आकर्षित करणं आलं.. मग त्यासाठी विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात, आणि आपला पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आपला उमेदवार मतदारां पर्यंत पोहोचवत असतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपनंही प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

कल्याण-डोंबिवलीत सध्या वासुदेव तुम्हाला हमखास दिसतील. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्राचारासाठी भाजपाचं हे अनोखं पण पारंपारीक पात्र. हे वासुदेव भल्या सकाळी मतदार राजाकडे मतदानाचा जोगवा मागत फिरत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या प्राचार समितीने एकूण ४० वासुदेवांचे प्रत्येकी दोन असे २० गट केले असून ते कल्याण-आणि डोंबिवली येथील विविध चौकात आणि वस्त्यांमध्ये भाजपाचा प्रचार करत आहेत.

या वासुदेवांना बघून चौक आणि वस्त्यांमध्ये लोक कुतुहलानं जमा होतात. आता या वासुदेवांचा मतांसाठी भाजपला किती फायदा होतो हे मात्र निवडणुकीच्या निकाल नंतरच दिसून येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.