पुणे : फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जेएनयू वादाचे पडसाद दिसून आले. दोन गटांनी दोन तासांपासून परस्पर विरोधी घोषणाबाजी केली, यामुळे काही काळ फर्ग्युसन कॉलेजात तणाव होता.
जेएनयूमधील अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग पुण्यात आला आहे, तो जेएनयूत काय घडले याची माहिती देत होता, फर्ग्युसनच्या किमया या खुल्या मंचावर तो भाषण ठोकत होता.
शंभरच्या आसपास विद्यार्थी जमले असताना, काही जण आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीतले असे सांगून प्रतिवाद करू लागले, यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
भारतीय संविधानाचा दाखला देणाऱ्या आणि कन्हैय्या कुमारला पाठिंबा देणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान पोलीसांनी वातावरण शांत केले. दोन्ही गटांना कॉलेजबाहेर काढले, यानंतर शहर पोलीस दंगल नियंत्रण पथकाची गाडीभरून कुमकही मागविण्यात आली.