जयकुमार रावल यांनी घेतली नारायण राणेंची भेट

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज अचानक काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची त्यांच्या कणकवलीमध्ये भेट घेतली. 

Updated: Apr 2, 2017, 02:52 PM IST
जयकुमार रावल यांनी घेतली नारायण राणेंची भेट title=

कणकवली : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज अचानक काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची त्यांच्या कणकवलीमध्ये भेट घेतली. 

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच  ही भेट झाल्यानं चर्चांना ऊत आलाय. नारायण राणे आणि जयकुमार रावल यांची एख तासभर चर्चा झाली. 

जयकुमार रावल हे नितीन गडकरींचे तगडे समर्थक मानले जातात. त्यामुळे नारायण राणे भाजपमध्ये जाणार की काय, याची चर्चा पुन्हा सुरू झालीय.