जळगाव : धारागिर गावचे सरपंच यांनी जास्त ढोसली. त्याच अवस्थेत त्यांनी कार चालविण्याचे धाडस केले. हे धाडस त्यांच्याच जीवावर बेतले. त्यांची कार ५० फूट विहिरीत कोसळली. ही घटना पहाटे घडली.
एरंडोल जवळ मद्यधुंद अवस्थेत असलेले सरपंच स्विफ्ट कारसह विहिरित कोसळले. मात्र, सुदैवाने ते बचावले. त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. सरपंच पहाटे एका हॉटेलमधून घरी यायला निघाले. त्यांना जास्त झाल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी थेट महामार्गापासून ३० फूट अंतरावर असलेल्या ५० फूट विहिरीत कोसळली. या घटनेत सरपंच संजय पाटील मात्र बचावले.
या दुर्घटनेनंतर विहिरीतून सरपंच बाहेर आले होते. सकाळी गवकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र, सरपंच पाटील यांनी ढोसल्याचीच चर्चा जास्त होती.