शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा

शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Jan 14, 2016, 02:06 PM IST
शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा title=

औरंगाबाद : शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील ही घटना घडली. अल इरफ़ान या निवासी शाळेत हा प्रकार घडला. वर्ग मित्राच्या मारहणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. किरकोळ वादातून दोघांमध्ये जुंपली होती.

शेख अफरोज़ या मुलाला मारहाण करण्यात आली होती. त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी वर्ग मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.