तुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका

तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय. 

Updated: Oct 20, 2015, 10:20 AM IST
तुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका title=

नागपूर : तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय. 

नागपूरच्या वर्धमान नगर भागातल्या या डाळ मिलचे मालक अशोक गोयल गेल्या काही दिवसांपासून अतिशय त्रस्त झालेत. डाळीचा मुंबईहून पुरवठा झाल्यावर नागपूरला त्यांच्या डाळ मिलला तूर डाळ पोहोचल्यावर त्याचं वजन कमी असल्याचं आढळून येत होतं. या प्रकरणाचा तपास केला असता मुंबईहून कंटेनर भरून निघाले की ट्रकचालक किंवा वाहतूकदार महामार्गावर असलेल्या धाब्यांमध्ये डाळीची विक्री करतात. स्वस्तात डाळ मिळाली की धाबे मालक आपल्या कामासाठी डाळ वापरून उरलेली डाळ परत डाळ मिल मालकांना विकतात. कमतरता असल्याने चोरीची डाळही सहज विकली जायची. 

नागपुरात २० कंटेनर भरून रोज डाळीची आवक होते. डाळचोरीचा हा अनुभव सर्वच व्यापाऱ्यांना आलाय. ट्रकचालकच डाळीची चोरी करत असल्याने वाहतूकदारांच्या संघटनेकडे याची तक्रार करूनही संघटना याची दखल घेत नसल्याने आता डाळ मिल मालकांची संघटना पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती नागपूर डाळ मिल संघटना माजी अध्यक्ष चंद्रकुमार गुप्ता यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.