राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात

ठाणे महानगर पालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत विरोधक सभागृहात पुन्हा आमने-सामने आले. 

Updated: Nov 21, 2014, 11:14 AM IST
राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात title=

मुंबई : ठाणे महानगर पालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत विरोधक सभागृहात पुन्हा आमने-सामने आले. 

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ महासभा तहकुबिवरुन सत्ताधारी आणि विरोधक भिडले. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सचिवांच्या हातातून विषय पत्रिका खेचून घेतल्यावर वाद वाढला आणि सभागृहाच्या डायसवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले 

झोपलेले प्रशासन खडबडून जागे 
'झी मिडीया'ने जागृती नगर मेट्रो स्टेशन खालील रस्त्यावर असलेल्या काळोखाच्या साम्राज्याची बातमी दाखवली आणि झोपलेले प्रशासन खडबडून जागे झालं. मेट्रो सुरु झाल्यापासून ह्याठिकाणी काळोखाचे साम्राज्य होते झी मिडीया ने बातमी दाखवल्यामुळे आता या ठिकाणी पथदीवे लावण्यात आलेत. 

शिक्षक परिषदेचे धरणे आंदोलन 
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आलेली संच मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीकरिता राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या समोर धरणे आंदोलन करून सदरची मान्यता रद्द करण्यात यावी अश्याच एक पत्र शिक्षण अधिकार्यांना दिलंय.. 

लायसन्ससाठी मोबाईल नंबर सक्तीचा
लर्निंग लायसन्स काढायचं असेल तर यापुढे तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे सक्तीचे आहे असा अजब फतवाच जळगावच्या आरटीओ विभागाने काढलाय यामुळे वाहनधारकांची मात्र चांगलीच पंचाईत झालीय.  

कोल्हापुरात अट्टल गुन्हेगाराला अटक
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात भेसळयुक्त देशी - विदेशी मद्य तयार करणा-या अट्टल गुन्हेगाराला कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केलीय. त्याच्याकडुन दारु तयार करण्यासाठी लागणारे ५०० लीटर स्पिरीट, स्वाद, अर्क, दारु भरण्यासाठी लागणारे फिलींग मशीन, दारुच्या १० हजार रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आलं आहे. 

वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू 
चंद्रपूर जिह्यातील चिंतलधाबा गावात वाघाच्या हल्लयात ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. पदमा मडावी असं या महिलेचं नाव असून जंगलात सरपण गोळा करायला गेली असताना हा हल्ला झालाय. आतापर्यंत चंद्रपूरातला हा 13वा बळी आहे.

ठेवीदार संघटनेचे ठेचा भाकरी आंदोलन  
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील ठेवींची रक्कम मिळण्यासाठी ठेवीदार संघटनेने ठेचा भाकरी आंदोलन केलं. पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्याने राज्यभरातील असंख्य ठेवीदारांची उपासमार होतेय, वारंवार मागणी करूनही ठेवीची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार वैतागले आहेत. 
 
राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गुन्हा
शासनाची फसवणूक, माजी आमदार मनीष जैनांवर गुन्हा
राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सह सहा जणांवर जामनेर पोलिसांत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आलाय. काळा पैसा पांढरा करण्यासाठी जैन पिता पुत्रांनी कमी क्षेत्रात  सागवान लागवड करून जास्तीची सागवान  दाखवली होती.

गडचिरोलीत वन कर्मचारी त्रस्त
गडचिरोलीच्या आलापल्ली येथील वनविभाग मुख्यालयातील कर्मचारी IFS अधिका-याच्या कारवाईच्या बडग्याने त्रस्त झाले आहेत. कुठलीही कारणे दाखवा नोटीस न देता थेट निलंबनाचा सपाटा सुरु असल्याने आता कर्मचा-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलंय.

दीपोत्सोव साजरा
नेवासे येथे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दीप उत्सव मोठ्या उत्सवात  साजरा करण्यात आला. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेवून ७१८ वर्षे पूर्ण झाली त्यांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरी सांगितली व ज्ञानचां दिवा पेटवला म्हणून त्याची आठवण म्हणून हा दीपोस्तव केला जातो.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.