सांगली फटाके कारखाना स्फोटातील बळींची संख्या ११ वर

फटाके कारखान्यातील बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील दहा वर्षांत २५ हून अधिक बळी गेले आहेत. रेकॉर्डवर सात वर्षांत २२ बळींची नोंद मिळते. 

Updated: May 5, 2015, 01:07 PM IST
सांगली फटाके कारखाना स्फोटातील बळींची संख्या ११ वर title=

सांगली : फटाके कारखान्यातील बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील दहा वर्षांत २५ हून अधिक बळी गेले आहेत. रेकॉर्डवर सात वर्षांत २२ बळींची नोंद मिळते. 

फटाके बनविणाऱ्या कारखान्यात  सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. स्फोटक पदार्थ अधिनियम गुंडाळून ठेवून काम करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान, अशा धोकादायक कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
 
सातशे वर्षांपासून दसऱ्याला उत्सवाची परंपरा आहे. फटाक्‍याचा दर्जा चांगला राहावा, फटाके स्फोटक बनावेत, आवाज मोठा यावा, यासाठी फटाक्‍यात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा अतिवापर होऊ लागला. फटाके तयार करणारे कामगार अप्रशिक्षित असल्यामुळे आणि योग्य तंत्रज्ञान नसल्यामुळे स्फोटाच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.