मुंबई : कल्याणमधील युवकांनी इसीसच्या नादी लावणाऱ्या उद्योजकाला ताब्यात देण्याची मागणी होत आहे, अफगाणिस्तानचा हा उद्योजक असल्याने अफगाणिस्तान सरकारकडे ही मागणी होत आहे. कल्याणमधील युवकांना फूस लावण्याच्या बाबतीत उद्योजकाचं नाव समोर आल्याने, कल्याणच्या युवकांना इसीससोबत पाठण्यामागे कोण आहे, याचं चित्र स्पष्ट होतांना दिसतंय.
कल्याणच्या चार युवकांकडे हा उद्योजक गेला आणि त्यांनी इसिससाठी लढण्यासाठी मतपरिवर्तन केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये हा अफगाणी नागरिक दिल्लीतून निघून गेला. आता अफगाणिस्तानला गृह मंत्रालयाने त्याला ताब्यात देण्यासाठी विनंती पत्र पाठवले असून ते पत्र सक्षम न्यायालयात या आठवडय़ात सादर करण्यात आले.
या अफगाणी उद्योजकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, त्याचा भारतात सुकामेव्याचा व्यवसाय आहे. अफगाणी उद्योजकांची माहिती आता एनआयए घेत आहे.
एनआयएने अरीब मजीद याला अटक केल्यानंतर हा उद्योजक आकस्मिकरीत्या बेपत्ता झाला आहे. मजीद याला टर्कीतून गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतात आणले होते. मजीद हा २८ नोव्हेंबरला मुंबईत आला आणि तो सहा महिने इराकमध्ये होता नंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. गेल्या मे महिन्यात कल्याणचे चार युवक पश्चिम आशियातील धर्मस्थळांना भेट देण्यासाठी जातो असे सांगून बेपत्ता झाले होते. नंतर ते इसिससाठी लढण्याकरिता गेले.
अभियांत्रिकीच्या या चारही युवकांना नंतर २३ मे रोजी बगदादमध्ये आणण्यात आले. मजीदन मेल पाठवताना कुठला इंटरनेट पत्ता वापरला याची माहिती अमेरिकेने दिली होती.
एनआयएने अफगाण सरकारला त्या व्यक्तीचा पत्ता, बँक खाते, त्याचे आखातातील सहकारी, त्याने केलेले फोन याची माहिती दिली आहे. एनआयएने इराकमधून आल्यानंतर मजीदला अटक केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.