मुंबई : 'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)'हमाल' या पदासाठी तरुणांकडून अर्ज मागवण्यात आले... हमाल म्हणून काम करण्यासाठी आलेले अर्ज पाहून कुणालाही नक्कीच धक्का बसेल...
'ड' श्रेणीच्या या केवळ पाच जागांसाठी महाराष्ट्र भरातून जवळपास २५०० हून अधिक अर्ज आलेत. धक्कादायक म्हणजे, यातील पाच अर्जदारांनी एम. फीलचं शिक्षण पूर्ण केलंय... २५३ जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर ९८४ जणांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, 'हमाल' या पदासाठी पात्रता केवळ चौथी पास आहे. पण, आलेल्या अडीच हजार अर्जांपैकी केवळ १७७ जणांचं शिक्षण दहावीच्या आतील आहे.
आलेले अर्ज पाहून निवड अधिकाऱ्यांचंही डोकं गरगरलंय... त्यांनी आता 'हमाल' या पदासाठी ऑगस्ट महिन्यात लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय.