चाळीसगाव : राज्यात सत्ता येणाआधीच सत्तेची नशा चढण्यास भाजप नेत्यांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते विनोध तावडे यांनी थेट दमबाजीचीच भाषा केलेय.
आत्ता कुठे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. पण महायुतीच्या नेत्यांनी मात्र खातेवाटपही पार पाडलंय की काय असं वाटू लागलंय. नव्या सरकारमध्ये कुणाला गृहमंत्री पद मिळणार याचं भाकीतच भाजप नेते विनोद तावडेंनी केलंय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये पुन्हा संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेत तावडे आपण गृहमंत्री होणार असल्याचे सांगून टाकलं.
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उमेदवारीसाठी दावेदार असलेल्या उन्मेष पाटील या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर चाळीसगाव पोलिसांनी केलेल्या अन्यायाचा समाचार घेताना, त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा दम तावडे यांनी भरला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.