राष्ट्रवादीचे अजितराव घोरपडे यांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला धक्का दिलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

Updated: Sep 13, 2014, 03:48 PM IST
राष्ट्रवादीचे अजितराव घोरपडे यांचा भाजपात प्रवेश title=

सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला धक्का दिलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगलीमध्ये आज भाजपने मोठं शक्तिप्रदर्शन केलं. केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांची कवठेमहांकाळ इथं जाहीर सभा झाली. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ भाजपने सभेद्वारे केला. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सभेकडे लागल होते. 

या सभेत नितीन गडकरी यांनी यावेळी पाणी असणाऱ्या नेत्यांना निवडणून द्या. तेच नेते तुम्हाला पाणी देऊ शकतील, असे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार बदलणाऱ्यासाठी भाजपलाच निवडणून द्या, असे आवाहन यावेळी केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.