मतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट

नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

Updated: Feb 20, 2017, 04:29 PM IST
मतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट  title=

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाच्या या मोहीमेला बळकटी देण्यासाठी आता व्यावसायिकही पुढे सरसावले आहेत. मतदान केल्यावर जो कोणी चित्रपट पाहण्यासाठी जाईल किंवा जेवायला हॉटेलमधे जाईल त्याला 10 ते 20 टक्के सूट मिळणार आहे.

नाशिक शहरातील विजयानंद आणि दामोदर चित्रपटगृहात मतदान झाल्यानंतर जो कोणी चित्रपट पाहण्यासाठी जाईल त्याला चित्रपटाच्या तिकीटात 20 टक्के सूट मिळणार आहे. तसंच नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशननेही मतदान केलेल्यांना बिलामध्ये 10 ते 20 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.