रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.
दोन दिवसांपूर्वी बोअरवेलला आलेले धो -धो पाणी यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरीसाठ्यायांवर त्याचा परिणाम झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. १० हार्सपाँवरचा पंप लावून जमिनीतून जेवढ्या तीव्रतेनी पाणी खेचता येईल तेवढ्या तीव्रतेनी पाणी जमिनीतून वर येतय. त्यामुळे गावातल्या अनेक विहिरींचा पाणी आटतय. त्यामुळे भूगर्भातून येणारा हा पाण्याचा प्रवाह बंद केला गेला आहे.
पाहा हा व्हिडिडो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.