'अश्वबाजारात' नोटाबंदीच्या काळातही लाखोंच्या उलाढाली

सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. 

Updated: Dec 15, 2016, 11:22 AM IST
'अश्वबाजारात' नोटाबंदीच्या काळातही लाखोंच्या उलाढाली title=

नंदूरबार : सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. 

दत्त जयंती पासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात तीन हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एका दिवसात ३९ लाखाची उलाढाल झाली आहे. हा आकडा ७५ लाखांच्या  घरात जाईल अशी शक्यता आहे.

या वर्षी विविध जातिवंत घोडे दाखल झाले असून ती अश्व शोकीनासाठी एक पर्वणी आहे. या वर्षी घोडे बाजाराला चलनबंदीचा फटका बसेल असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरलाय. 

पहिल्याच दिवशी ११ लाखाला एका घोड्याची विक्री झाली असून बाजार ३९ लाख ५७ हजार रुपयावर बंद झाला. बाजारात तेजी असल्याने हा आकडा ७५ लाखांच्यावर जाईल, अशी अपेक्षा आयोजकांना आहे.