पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट

जे परिवर्तन राज्यात झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यात होईल, असा विश्वास पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय.

Updated: Dec 15, 2016, 08:27 AM IST
पवारांना पैसे मागण्याची सवय - बापट  title=

पुणे : जे परिवर्तन राज्यात झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यात होईल, असा विश्वास पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सभा घेण्यासाठी ५० रुपये लाख मागितले या अजित पवारांनी केलेल्या आरोपावरही गिरीश बापटांनी पुणेरी टोला हाणला. 'अजित पवारांना पैसे मागायची सवय आहे, मला मत मागण्याची सवय आहे' असं बापटांनी म्हटलंय. 

'परिवर्तना'चा विश्वास!

भारतीय जनता पक्ष एकमेव पार्टी आहे ज्यांनी जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढविली आहे. त्यामुळे लढाई कठीण आहे परंतु नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल असंही बापट यांनी सांगितलं.