उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती

उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय. 

Updated: Jul 9, 2014, 07:04 PM IST
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती  title=

सोलापूर: उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय. 

उजनी.. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं हे धरण.. साधारणतः 40 ते 42 वर्षांपूर्वी हे धरणं अस्तित्वात आलं. शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या या धरणाच्या चार गाळमोऱ्यांमधून दररोज शेकडो लीटर पाणी गळतंय. शेकडो एकर शेती भिजेल एवढं पाणी रोज वाया जातंय. गाळमोऱ्यांची दुरूस्ती वेळीच झाली नाही तर भविष्यात मोठा धोका उदभवण्याचा धोका आहे..

धरणातून होत असलेल्या य़ा गळतीबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांसह राज्य आणि केंद्रातल्या मंत्र्यांना माहिती देण्यात आली. निधीची मागणी करणारी पत्रही पाठवण्यात आली. मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलंय. या गळतीमुळं आज धरणाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. याविरोधात काही सामाजिक संघटनांनी आंदोलन उभं करण्याचा इशारा दिलाय.

उजनी धरणाची पाणीपातळी सध्या धोकादायकरित्या खाली गेलीय. ही गळती तातडीनं रोखणं गरजेचं आहे.. झी मीडियातर्फे आम्ही सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देत आहोत. आता तरी सरकारनं याची तातडीनं दुरूस्ती करावी. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.