लातूर : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात वरुणराजाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा दुष्काळ हा आता संपला आहे. लातूर शहराची अभूतपूर्व पाणी टंचाईही मिटली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 843.65 मिमी पावसाची नोंद झालीय... हा पाऊस म्हणजे सरासरीच्या 101 टक्के एवढा आहे. जिल्ह्यातल्या सर्वच नद्या, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, तलाव, नाले हे असे भरभरून वाहत आहेत.
लातूरला पाणी पुरवठा करणा-या मांजरा धरणात 25 दशलक्ष घनमीटर पाणी साचलंय. त्यामुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटलाय.