नाशिक/पालघर/रायगड/कोल्हापूर: राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. कर्जतच्या मोहाचीवाडी इथं घराची भिंत कोसळून ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
पालघरमध्ये नद्यांना पूर
पालघर आणि परिसरात रात्रभर झालेल्या पावसामुळं नद्यांना पूर आलाय. चिल्हार फाटा जवळील हात नदिवरील पर्यायी पूल पाण्याखाली गेलाय. बोईसर-चिल्हार हायवेवरील वाहतूक ठप्प. नदीवर सूरू असलेलं पूलाचं काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलंय.
कोल्हापुरात पाऊसाचा जोर
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर चांगलाच वाढलाय. अनेक तालुक्यात आतिवृष्टी झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत ३ दिवसांत १० फूटानं वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
चौदा गावांचा घोटी शहराशी कालरात्री पासून संपर्क तुटला
घोटी काळूस्ते रस्त्यावरील दारणा नदीपात्राजवळील कच्चा रस्ता वाहून गेल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडलीय. गावांमध्ये शेकडो ग्रामस्थ अडकले आहेत. नवीन पुलाचं काम ठेकेदाराच्या निष्क्रियेतेमुळं रखडल्यानं काळुस्ते, भरवज, नीरपण, शेनवड औचितवाडी तळोघ, तळोशी, आंबेवाडी, कुरुंगवाडी, खडकवाडी आणि इतर चार वाडया अशा चौदा गावांचा घोटी शहराशी कायमस्वरूपी संपर्क तुटला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.