खानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर

खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.

Updated: Jul 23, 2014, 08:39 PM IST
खानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर title=

जळगाव : खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.

धरणातून नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याचा जलप्रपात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. धरणातून पाणी सोडल्याने तापी नदीला महापूर आला आहे. तालुका प्रशासनाने तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संततधार पावसामुळे परिसरातील यावल, रावेर तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लहान नद्या, नाल्यांनी पाण्याची पातळी ओलांडल्याने गावाने जाणारे रस्ते पाण्याखाली आल्याने दोन्ही तालुक्‍यातील बससेवा, खासगी बस सेवा बंद झाल्या आहेत.

भुसावळ शहरातही नाल्याचे पाणी अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहने रस्त्यावरून नेणे कठीण झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.