पुणे : थोडासा थकवा आल्याने आपण डॉक्टरकडे आलोय. माझी प्रकृती उत्तम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेय.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील रुबी रुग्णालयात पवार यांना दाखल करण्यात आलेय. सकाळपासून सोशल मीडियावर उलट-सुलट अफवा पसरल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले होते. मात्र ' माझी प्रकृती अतिशय उत्तम असून मी ठणठणीत आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका' असे खुद्द शरद पवार यांनीच ट्विट केलेय.
शरद पवार यांना अतिश्रमामुळे थकवा आल्याने त्यांना रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरीचशी सुधारली. खुद्द पवार यांनी कालच ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट करत सर्व पाठिराख्यांचे आभार मानले होते.
आज पवार यांनीच या वृत्ताचे खंडन केले असून त्यांच्या डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याचे सांगत त्यांचे सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल असल्याचे स्पष्ट केलेय. पवारांना उद्या दुपारी डिस्चार्ज देण्यात येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
I am well and perfectly fine. Thank for your good wishes.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 26, 2016
Mr. S Pawar reports normal, Doctors very happy. Discharge Wednesday (Tomor) or Thursday morning , all under control.
— Supriya Sule (@supriya_sule) January 26, 2016
पाहा व्हिडिओ :
अफवांवर विश्वास ठेवू नका. आदरणीय @PawarSpeaks साहेबांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती - https://t.co/3DXlVuxyTF
— NCP (@NCPspeaks) January 26, 2016