गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिस्ट नेत्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय.

Updated: Feb 16, 2015, 03:45 PM IST
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध title=

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिस्ट नेत्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय.

कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या जीवनात कष्टकरी,उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी साठ वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणा-या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर त्यांच्या कोल्हापूरातल्या रहात्या घराजवळ आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय.

बाईक वरून आलेल्या या हल्लेखारांनी पानसरेंवपर अगदी जवळून पाच राऊंड फायर केल्या. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी उमा पानसरेही जखमी झाल्या आहेत. दोघांवरही कोल्हापुरातल्या अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. उमा पानसरेंच्या प्रकृतीचा धोका टळलायं. मात्र गोविंद पानसरेंची प्रकृती चिंताजनक आहे. 

औरंगाबादेत गोविंद पानसरेवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शहरातील सर्वंच कम्युनिस्ट नेते आणि सर्वसामान्य नागरिक ही निदर्शनात सहभागी झाले. पानसरेंवरील हल्ला हा निंदनीय आहे. सरकारनं तातडीनं मारेक-यांना शोधत कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केलीय. तर नाशिकमध्येही कॉम्रेड गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शहरात निषेध मोर्चा काढून मेहेर सिग्नलवर आंदोलकांनी रास्ता रोको केला.

- कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही गोविंद पानसरेंच्या मारेक-यांचा शोध लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पानसरेंवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केलाय.

- आरपीआय नेते रामदास आठवले यांनी गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याची चौकशी व्हावी आणि आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.