नांदेड: मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला. त्यामुळं दिल्ली विधासभेत पराभव झाल्यानं खचलेल्या भाजपसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
भाजपचे विजयी उमेदवार तुषार राठोड यांना १ लाख ३३९ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या हनुमंत बेटमोगरेकर यांना ५३ हजार ७१ मतांवर समाधान मानावं लागलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी या मतदारसंघात अनेक सभांसह मुक्कामही केला होता.
मुखेड विधानसभेतून भाजपचे गोविंद राठोड हे ७३ हजारच्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर भाजपनं गोविंद राठोड यांचे चिरंजीव तुषार राठोड यांना मैदानात उतरवलं होतं.
अजूनही सगळीकडे पंतप्रधान मोदींची जादू कायम असल्यानंच आपला विजय झाल्याचं डॉ. तुषार राठोड यांनी यावेळी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.