नाशिक : जे सरकारी अधिकारी चांगलं काम करतील, त्यांनाच चांगली पगारवाढ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिलेत.
यापुढे सरकारी अधिकाऱ्यांसाठीदेखील KRA असतील. या KEY RESULT AREAS वरच अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना केआरए दिलेत. आम्ही दिलेले टार्गेट कमी होते. ते अधिकाऱ्यांनी वाढवून घेतले आहे. त्यामुळे शासनअधिकारी चांगले काम करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या नवा आदेशामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना चालढकल करता येणार नाही. जेवढी अधिक वर्षे झालीत की त्यांना बढती मिळते, आता तसे काही होणार नाही. होतय, चाललंय असं आता सरकारी बाबूना करता येणार नाही. त्यामुळे चांगले काम करा आणि पगारवाढ घ्या असा भाजप-शिवसेना सरकारने दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.