नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. 

Updated: Oct 16, 2016, 04:16 PM IST
नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर title=

नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. 

मागील वर्षी १३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. त्यात आता ५०० रुपये भर घालण्यात आलीय. त्याचबरोबर महापलिकेच्या सर्व स्थायी कर्मचाऱ्यांचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

यासाठी एक हजार रुपये कर्मचा-यांना द्यायचे तर एक हजार रुपये महापालिका प्रशासन अदा करणार आहे. सात हजाराहून अधिक कर्मचा-यांना या घोषणेचा लाभ होणार असल्यानं कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.