गोटे आडनावावरून चिडवतात म्हणून तिने केली आत्महत्या

गोटे आडनावावरून वर्गामध्ये प्राध्यापक टिंगल करतात म्हणून अकरावीतल्या एका तरूणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली... 

Updated: Jul 27, 2016, 10:50 PM IST
 गोटे आडनावावरून चिडवतात म्हणून तिने केली आत्महत्या title=

लासूर : गोटे आडनावावरून वर्गामध्ये प्राध्यापक टिंगल करतात म्हणून अकरावीतल्या एका तरूणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली... 

ही घटना घडलीय औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशनमध्ये... दीपाली गोटे असं या मुलीचं नाव असून ती लासूरच्या न्यू हायस्कूल कॉलेजमध्ये शिकत होती. 

गणिताचे प्राध्यापक वर्गामध्ये तिच्या गोटे आडनावाची टिंगल करत तिला गोटा म्हणून हिणवायचे. हा अपमान सहन न झाल्यानंच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय. 

या प्राध्यापकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलीय. याप्रकरणी लासूर स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आलीय.