रत्नागिरीत अचानक गॅस्ट्रोची साथ... एकाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये बोरज गावात अचानक गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. 

Updated: Mar 17, 2015, 01:21 PM IST
रत्नागिरीत अचानक गॅस्ट्रोची साथ... एकाचा मृत्यू title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये बोरज गावात अचानक गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. 

यात गावात एकाच वेळी ४० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून यात एकाचा मृत्यू झालाय. ८ ते १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नळपाणी योजनेमधून दूषित पाणीपुरवठा झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. 

बोरज आणि शिव गावाला जिल्हा परिषदेची पाणी योजना लागू आहे. मात्र, आसपासच्या गावांमध्ये ही योजना नाही. त्यामुळे हा संशय अधिक बळावलाय. गॅस्ट्रोची लागण झालेल्यांना कळंबणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात तर गंभीर असलेल्या रुग्णांवर चिपळूणनजिक डेरवणला उपचार सुरु आहेत.

चिपळूणच्या धन्वंतरी रुग्णालयात वनीता सिताराम कावणकर यांचा मृत्यू झालाय. अनेक रूग्णांना अद्याप जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे पुरेशी औषधसामुग्री नसल्याचं सांगितलं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.