गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना

मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना 

Updated: Sep 5, 2016, 07:50 PM IST
गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना title=

मुंबई : मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून गणेश चतुर्थी निमित्तानं या ट्रेनमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षीही गणरायाची वाजत-गाजत उत्साहात स्थापना करण्यात आली आणि दररोजचा प्रवास सुखाचा होण्याची प्रार्थना करण्यात आली. 

मनमाड-मुंबई दरम्यान रोज शेकडो नोकरदार प्रवास करतात. गणेशोत्सव काळात त्यांनाही आनंद साजरा करता यावा, यासाठी या ट्रेनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते. यानिमित्तानं ट्रेनमध्ये आकर्षक सजावटही करण्यात आली होती.

पाहा व्हिडिओ