पुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू

दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली. 

Updated: Nov 3, 2014, 08:32 AM IST
पुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू title=

उरुळी कांचन, पुणे : दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकी गावात १ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान हा प्रकार घडला.

ही महिला आपल्या पतीसोबत वडकी इथं राहात असून, त्यांच्या शेजारीच तिचे दीर राहातात. ते दोघे दिवाळीसाठी गावी गेल्यानं त्यांच्या घराला कुलूप होतं. या महिलेला त्यांच्या पतीचा फोन आला, पण आवाज नीट ऐकू येईना म्हणून ती घराच्या बाहेर आली. तेव्हा त्यांना दीराच्या घराचं दार उघडं दिसलं, म्हणून फोन संपल्यावर त्या दीराच्या घरात गेल्या, तेव्हा त्यांना दोन चोरटे उचकापाचक करताना दिसले. त्यांनी त्यांना ‘तुम्ही कोण, इथं काय करता?’असं विचारलं असता, त्या दोघांनी महिलेला पकडून खोलीचं दार लावून घेऊन आळीपाळीनं बलात्कार केला आणि निघून गेले.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३७६ अन्वये दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ हे तपास करीत आहेत. पीडित महिलेवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.