पंढरपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
यावर खडसे म्हणाले, भाजपची सत्ता आली याचा आनंद आहे. पण, राज्याचा मुख्यमंत्री हा बहुजन असायला हवा होता, अशी राज्याच्या जनतेची इच्छा होती, यावरून एकनाथ खडसेंची नाराजी काही दूर व्हायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.
एकनाथ खडसे आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते. विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान एकनाथ खडसेंना यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून त्यांना हा सन्मान बहाल केला. पण, तरीही मुख्यमंत्रिपदावरुन नाराज असलेल्या खडसेंची नाराजी कायम असल्याचं चित्र आहे.
राज्यातल्या जनतेनं भाजपला सत्ता दिली. त्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असावा अशी बहुजनांची इच्छा होती. बहुजन म्हणजे केवळ आपण नव्हे, तर तो वंजारी किंवा इतर समाजाची चालला असता असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
पण, जनतेनं भाजपला सत्ता दिली याचा आम्हाला आनंद असल्याचंही खडसे म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानं नाराज असलेल्या खडसेंनी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्रीपदावरून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी, भाजपचा विधिमंडळपक्षाचा नेता निवडतांना, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव करतांना खडसेंना सूचक करण्यात आलं होतं हे विशेष.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.