सर्व सामान्यांसाठी साई संस्थानकडून व्हीआयपी पास

सर्व सामान्यांसाठी साई संस्थानने व्हीआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे. फक्त ठराविक व्यक्तींना मिळणारा व्हीआयपी पास आता कोणाच्याही शिफारशी शिवाय मिळणार आहे.

Updated: Oct 12, 2016, 10:47 AM IST
सर्व सामान्यांसाठी साई संस्थानकडून व्हीआयपी पास title=

शिर्डी : सर्व सामान्यांसाठी साई संस्थानने व्हीआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे. फक्त ठराविक व्यक्तींना मिळणारा व्हीआयपी पास आता कोणाच्याही शिफारशी शिवाय मिळणार आहे.

सामान्य साईभक्तांनाही बाबांचे झटपट दर्शन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर वयोवृद्ध व्यक्तीच्या आणी एक वर्षाच्या आतील बाळ असणाऱ्या मातेसह कुटुंबातील सदस्यांना झटपट मोफत साईदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रूग्णसेवेसाठीही साईसंस्थानने पुढाकार घेतलाय अॅम्ब्यूलन्स विना कोणत्याही गोरगरीब लोकांना आपला जीव गमवावा लागू नये यासाठी राज्यातील जनतेसाठी ५०० अॅम्ब्यूलन्स देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतलाय.