भिवंडीत रंगली भव्य किल्ले स्पर्धा

दिवाळी सण आणि किल्ला यांचे नाते अतूट आणि जुने आहे. दिवाळीत बनवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपल्याला साक्ष देतात. 

Updated: Oct 31, 2016, 03:03 PM IST

ठाणे : दिवाळी सण आणि किल्ला यांचे नाते अतूट आणि जुने आहे. दिवाळीत बनवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपल्याला साक्ष देतात. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांच्या शौर्याची साक्ष देणारे असे हे किल्ले दिवाळीत अनेक ठिकाणी बनवले जातात. दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. हीच परंपरा जपण्याचा प्रयत्न भिवंडीतील ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठान करतेय. 

संपूर्ण फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या आठ वर्षांपासून भिवंडीतील ध्येय स्फूर्ती प्रतिष्ठानकडून किल्ले स्पर्धा भरवली जात आहे. यंदाही भिवंडीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही या किल्ले स्पर्धेत स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला होता. शिवरायांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या अनेकाविध किल्ल्याच्या प्रतिकृती दाखवण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धेच्या निमित्ताने पोकेमॉन आणि कार्टूनच्या जगात वावरणाऱ्या मुलांना शिवरायांचा इतिहास, गड-किल्ले यांची जवळून ओळख व्हावी असा प्रयत्न या प्रतिष्ठानकडून केला जातोय. 

पाहा व्हिडिओ