शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

माछिल सेक्टरमध्ये पाकिस्ताननी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Oct 31, 2016, 11:48 AM IST
शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप title=

दुधगाव, सांगली : माछिल सेक्टरमध्ये पाकिस्ताननी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीच्या नितीन कोळींना वीरमरण आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, प्रांताधिकारी विकास खरात, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. 

शहीद कोळी यांच्या कुटुंबियाना मुख्यमंत्र्यांनी 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्या शिवाय जी जी शक्य आहे, ती मदत राज्यसरकार करणार आहे. कोळी यांना दोन लहान मुलं, पत्नी आणि आई-वडील आहेत. कोळी यांच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.