रत्नागिरीत भर दिवसा फिल्मी स्टाईलने ट्रक चालकाला लुटले

भाट्ये परिसरात दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलनं ट्रक चालकाला लुटण्याची घटना घडली. 

Updated: Oct 19, 2016, 10:19 PM IST
रत्नागिरीत भर दिवसा फिल्मी स्टाईलने ट्रक चालकाला लुटले title=

रत्नागिरीत : भाट्ये परिसरात दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलनं ट्रक चालकाला लुटण्याची घटना घडली. 

ट्रकच्या समोर गाडी आडवी करून दुचाकीस्वाराने लुटले. मात्र, रत्नागिरी पोलिसांच्या चतुराईने अवघ्या एका तासाच्या आत घटनेनंतर या लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली.

शादिक मुजावर हा अट्टल गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याने अशा प्रकारे आणखी कुठे प्रकार केलाय का याचा तपास शहर पोलीस करत आहेत.