कोल्हापूर : शहरातील रेणुका मंदिरांत चोरीचा प्रयत्न झाला. मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. मात्र, विरोध करणाऱ्या पुजारी सुनील मेढे यांना वीराज आर. सी गँगच्या गुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली.
रेणुका या मंदिरातील पुजारी सुनील विलास मेढे हे मंदिरात बसले होते. त्यावेळी वीराज शेंडे याने भक्तांनी दान केलेले दान पेटीतील पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुजारी मेढे यांनी वीराजला रोखले.
वीराजला रोखल्यानंतर वीराज आर. सी गँगच्या गुंडाना घेऊन मंदिरात दाखल झाला. त्यानंतर पैसे घेत असताना अडवणूक का केली, या रागातून पुजाऱ्याला जबर मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पुजाऱ्याला मंदिरातून बाहेर आणून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही सगळी दृष्य मंदिर आणि मंदिर परिसरातील सी.सी.टीव्हीत कैद झालीत.
रेणुका मंदिरच्या कब्जाचा वाद उफाळला असून, परिसरातील आरसी गँगची दहशत या निमित्ताने पुढे आली आहे.