जळगाव : जळगाव जिल्ह्यात पिककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा जिल्हा बँकेच्या शाखांसमोर दिसून येत आहेत. वास्तविक पाहत १५ एप्रिलपासून वार्षिक मुदतीचं पिककर्ज वाटप करण्यास सुरूवात व्हायला हवी, मात्र तसं होतांना दिसत नाहीय.
शेतकरी जिल्हा बँकांच्या शाखेसमोर ताटकळत बसले आहेत, उन्हाच्या तडाख्यात त्यांना रांगा लावण्याची वेळ आली आहे.
गावागावातील पिक संरक्षक सोसायट्या आणि जिल्हा बँकांच्या शाखेत कॅश शिल्लक नसल्याचं कारण सांगण्यात येत आहे. काही राष्ट्रीयीकृत बँका जिल्हा बँकेच्या शाखांना पुरेशी कॅश देत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
या बँका जिल्हा बँकेच्या शाखांना पुरेशी कॅश देत नसल्याने शेतकऱ्यांना पिककर्ज मिळण्यास उशीर होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.