जालना : खरपुडी गावात अतिशयक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या तुम्ही नेहमीच पाहत असतात. मात्र कर्ज आणि नापिकीला कंटाळलेल्या एका शेतक-यांनं गावक-यांना आपल्या अंत्यविधीचं निमंत्रण देऊन मृत्यूला कवटाळलंय.
शेषराव शेजूळ असं या शेतक-याचं नाव असून आतल्या दिवशी सर्व गावक-यांना आपल्या अंत्यविधीचं निमंत्रण त्यांनी दिलं. त्यानंतर दुस-या दिवशी आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्र संपवली.
शेषराव शेजुळ यांची 2 एकर 5 गुंठे जमीन आहे. पावसाअभावी यंदा रानातलं सोयाबीन शेंगा लागायच्या आधीच करपून गेलं. त्यामुळं त्यांनी जालन्यात येऊन खाजगी नोकरी किंवा रोजंदारीची कामे देखील केली.
दुष्काळामुळं पैशाअभावी संसाराचा गाडा हाकण दिवसेंदिवस अवघड होत चालल होतं. त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना भेडसावत होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी खासगी सावकाराचा ८० हजारांच्या कर्जाचा डोंगर त्यांच्यावर होता. त्यामुळं कर्ज आणि नापिकीला कंटाळून त्यांनी मृत्युला कवटाळल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.