रत्नागिरीत पोलीस वेशात वयोवृद्धांना लुटण्याचा घटनांत वाढ

शहर परिसरात आणि चिपळूण शहरात बनावट पोलिसांनी सध्या वयोवृद्धांना टार्गेट केलंय. एकटं गाठून आपण पोलिस असल्याचं सांगत सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला जातोय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2017, 12:47 PM IST
रत्नागिरीत पोलीस वेशात वयोवृद्धांना लुटण्याचा घटनांत वाढ title=

रत्नागिरी : शहर परिसरात आणि चिपळूण शहरात बनावट पोलिसांनी सध्या वयोवृद्धांना टार्गेट केलंय. एकटं गाठून आपण पोलिस असल्याचं सांगत सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला जातोय. 

आम्ही पोलीस आहोत. तुमच्याकडे ब्राऊन शुगरचा साठा असल्याचा संशय आहे असं सांगून तपासणी करताना हातचलाखी करुन या वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटण्यात येतायत. 

एक दोन नव्हे तर अशा तब्बल सहा घटनांमुळे सध्या रत्नागिरी पोलिसांची झोप उडालीय. पोलिसांनी या चोरट्यांचं रेखाचित्र तयार केलंय. त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय.