फडणवीस सरकारचं 'मेक इन महाराष्ट्र' जोरात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'मेक इन इंडिया' या घोषणेच्या धर्तीवर आधारीत 'मेक इन महाराष्ट्र' यशस्वी बनविण्यासाठी साठी फडणवीस सरकारनं कंबर कसलीय. 

Updated: Jan 16, 2015, 10:47 AM IST
फडणवीस सरकारचं 'मेक इन महाराष्ट्र' जोरात... title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'मेक इन इंडिया' या घोषणेच्या धर्तीवर आधारीत 'मेक इन महाराष्ट्र' यशस्वी बनविण्यासाठी साठी फडणवीस सरकारनं कंबर कसलीय. 

'मेक इन महाराष्ट्र'साठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह ११ विभागाच्या सचिवांचा त्यात समावेश असणार आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही समिती उपाययोजना सुचवणार आहे.

दरम्यान, समितीच्या पहिल्याच बैठकीत १० मेगा प्रोजेक्ट्सना परवानगी देण्यात आलीय. त्यातून ४ हजार २८५ लोकांना रोजगार मिळणार आहेत. येत्या काळात ८ हजार ४५६ कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून १२ मोठे उद्योग उभे राहणार आहेत.

उद्योग उभारणीसाठी यापूर्वी सुमारे ७५ परवानग्या घ्याव्या लागत होत्या. 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत ही संख्या आता २५वर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.