पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळं अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज

पुणे पोलिसांच्या अंसवेदनशीलतेचा आणखी एक प्रकार समोर आलाय. पिंपरी-चिंचवडमधली १५ वर्षांची एक मुलगी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळं मृत्यूशी झुंज देतेय.

Updated: Jan 15, 2015, 11:40 PM IST
पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळं अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज  title=

पुणे: पुणे पोलिसांच्या अंसवेदनशीलतेचा आणखी एक प्रकार समोर आलाय. पिंपरी-चिंचवडमधली १५ वर्षांची एक मुलगी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळं मृत्यूशी झुंज देतेय.

यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज असलेली ही १५ वर्षांची तरुणी... पोलिसांनी तिच्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर कदाचित तिची ही अवस्था झाली नसती. ३१ डिसेंबरच्या रात्री या तरुणीला भोसरी इंद्रायणी नगर भागातल्या राहत्या घरी तीन तरुणांनी छेडण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईनं मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला पण या मुलांनी आईलाही धक्काबुक्की केली… त्यानंतर या मुलीच्या आईनं भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनमधले उपनिरीक्षक एस. एच. भागवत यांच्याकडे तक्रार दाखल केली. पण या मुलांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. 

या प्रकरणाची माहिती मिळताच सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जात मुलीची भेट घेतलीय. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

गेले काही दिवस भोसरी पोलिसांच्या अकार्यक्षमतेची अनेक उदाहरणं पुढे आलीयत. आता तर त्यांच्या या असंवेदनशीलतेमुळं एका निरपराध तरुणीला मृत्यूशी झुंझावं लागतंय. अजूनही पोलीस या प्रकरणावर काहीही बोलायला तयार नाहीत. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.