...आणि एकनाथ खडसे यांनी जळगावात तोंड उघडले

महसूल मंत्री आणि अन्य मंत्री पदाचा राजीनामा दिलेले भाजप नेते एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. मुक्ताई या त्यांच्या घरी काहीही न बोलता कार्यकर्त्यांशी हस्ताआंदोलन केले. मात्र, दुसऱ्या कार्यक्रमात त्यांनी तोंड उघडले आणि कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला.

Updated: Jun 11, 2016, 06:31 PM IST
...आणि एकनाथ खडसे यांनी जळगावात तोंड उघडले title=

जळगाव : महसूल मंत्री आणि अन्य मंत्री पदाचा राजीनामा दिलेले भाजप नेते एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. मुक्ताई या त्यांच्या घरी काहीही न बोलता कार्यकर्त्यांशी हस्ताआंदोलन केले. मात्र, दुसऱ्या कार्यक्रमात त्यांनी तोंड उघडले आणि कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला.

 
राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी मुंबईत तळ ठोकला होता. त्यानंतर वरिष्ठांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. ते रिकाम्या हाताने मुंबईत दाखल झालेत. दुसऱ्या दिवशी आज जळगाव गाठले. जळगावमध्ये आल्यानंतर सकाळपासून जाहीरपणे बोलण्यावर ताबा ठेवणारे एकनाथ खडसे यांनी जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सवर्साधारण सभा तसेच सत्कार समारंभ कार्यक्रमात जाहीर भाषण केले. 

ते म्हणालेत, खड्सेंचे काय होईल हे अनेकांना चिंता आहे. खडसे जळगावात येतील की नाही असेही अनेकांना वाटले. परंतु आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. कार्यकर्त्यांचे आणि जनतेने दिलेले प्रेम माझ्यासाठी खूप आहे.