एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद

गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषण करणे टाळले. त्यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद साधला.

Updated: Jun 11, 2016, 05:06 PM IST
एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद title=

जळगाव : गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषण करणे टाळले. त्यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद साधला.

खडसेंनी भेट देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करून संवाद साधला. खडसेंच्या मुक्ताई बंगल्यासमोरील जागेत छोटेखानी मंडप उभारून भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खडसेंनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे भाषण करणे टाळले.

दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी मात्र जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत गेले पंधरा दिवस खल झालेल्या राजीनामा विषयाला छेडून जोरदार भाषण ठोकले. खडसेंनी जाहीरपणे बोलणे का टाळले, याविषयी जोरदार चर्चा आहे.