रिक्षा चालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून बनवली ड्रीम कार

खारघरमधील रिक्षाचालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून एक ड्रीम कार तयार केली आहे. टाकाऊ सामानाचा वापर करून कार तयार केली आहे.  

Updated: Oct 26, 2016, 03:51 PM IST
रिक्षा चालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून बनवली ड्रीम कार  title=

नवी मुंबई : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येतं. खारघरमधील रिक्षाचालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून एक ड्रीम कार तयार केली आहे. टाकाऊ सामानाचा वापर करून कार तयार केली आहे. सध्या ही ड्रीम कार खारघरवासियांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

खारघरमधील सत्याग्रह महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या प्रेम ठाकूरनं ही ड्रीम कार तयार केलीय. त्याच्या कामगिरीची दखल ऑटोमोबाईल क्षेत्रानं देखील घेतली. भंगारात पडलेल्या अॅसेंट गाडीच्या सामानाची जुळवाजुळव करून ही गाडी बनविण्यात आली आहे.

ही स्ट्रीट कार तयार करण्यासाठी प्रेमला अडीच लाखाचा खर्च आला. विशेष म्हणजे या कारचं इंजिन मागे आहे. तसंत या कारमध्ये दुचाकीचे सस्पेंशन वापरण्यात आलेत. पाच गिअरची ही कार असून सध्यातरी स्थानिक पातळीवर चालवू शकतो. या कारचा स्पीड शंभरच्यावर असून सध्यातरी ही गाडी केवळ १० किमीपर्यंत कव्हरेज देते. 

वडील एकनाथ ठाकूर हे खारघरमध्ये रिक्षा चालवतात. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी देखील काहीच कुचराई न करता एक एक पैसा गोळा करून मुलाला मदत केली. कोणत्याही प्रकारचे ऑटोमोबाईल क्षेत्राचा अनुभव नसताना प्रेमचे कार्य कौतुकास्पद आहे.