बेकायदा गर्भपात कणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू

बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2017, 07:30 PM IST
बेकायदा गर्भपात कणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू  title=

नाशिक : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.

नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील शिंदे हॉस्पिटलवर दहा दिवसांपूर्वी  फौजदारी कारवाई करून हॉस्पिटल सील करण्यात आलं होतं. होमियोपॅथीची डिग्री असणऱ्या बळीराम शिंदेने ओझर गावातील हॉस्पिटलमध्ये एका महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर बळीराम शिंदेला आठ दिवसांपूर्वी अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान या कोठडीत असतानाच हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने  त्याचं निधन झाले.