चॉकलेट खाणं जीवावर बेतलं असतं पण...

चॉकलेट खायला कोणाला आवडणार नाही.?पण हेच चॉकलेट तुमच्या जीवावर बेतलं तर... असं घडलंय इंदापुरात पाहूयात...

Updated: Apr 8, 2015, 01:41 PM IST
चॉकलेट खाणं जीवावर बेतलं असतं पण... title=

इंदापूर : चॉकलेट खायला कोणाला आवडणार नाही.?पण हेच चॉकलेट तुमच्या जीवावर बेतलं तर... असं घडलंय इंदापुरात पाहूयात...

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भिगवणचे बस स्थानकावर अनेकदा लुटमारीचे प्रकार घडतात. सोमवारीही असाच प्रकार घडणार होता... पण प्रवासी...ग्रामस्थ आणि वाहतूक नियंत्रकांच्या संतर्कतेनं टळला.

स्वारगेट-करमाळा एसटीनं दत्तात्रय पाटील हे 65 वर्षांचे आजोबा प्रवास करत होते. त्यात त्यांना एका इसमानं चॉकलेट खायला दिलं. चॉकलेटमुळे आजोबांना गुंगी आली. त्याचाच फायदा घेत त्या भामट्यानं आजोबांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं ऐवज घेऊन पळून जाताना पोलिसांनी भामट्याला पकडलं. 

सुरेश भाटी असं या भामट्याचं नाव आहे. या भामट्यानं दौंड इथंही अशाच प्रकारे गुंगीचे औषध देऊन अनेकांना फसवल्याचे गुन्हे दाखल असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी म्हटलंय. 

दत्तात्रय पाटील यांच्यासारखे अनेकजण अमिषाला बळी पडतात. त्यामुळे, कुणाही अनोळखी इसमाकडून देण्यात येणाऱ्या अमिषाला बळी पडू नका... अनोळखी व्यक्तीकडून कुठलीही वस्तू घेण्याचा मोह टाळा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.