पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये वायसीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याच सांगत रुग्णालयात दाखल करुन न घेता घरी पाठवले. घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.अरूधंती रमेश ढाकणे अस मृत्यू झालेल्या 9 महिन्याच्या बालिकेचे नाव आहे.
अरूंधतीच्या मृत्यूला डॉक्टर हेच जबाबदार असल्याचा आरोप वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. रमशे ढाकणे हे भोसरी येथे राहतात. गुरुवारी रात्री 9 महिन्याच्या अरूधंतीची प्रकृती खालावली. त्यामुळे रमेश ढाकणे तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते.
वायसीएम मधील शिल्पा रावडे यांनी अरूधंतीची प्रकृती ठीक असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही. तसेच बाहेरुन औषधे आणून घरी पाठवून दिले. घरी गेल्यावर तिची प्रकृती खालावली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, मृत अरूंधतीचे वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. अरूंधतीला वेळीच उपचार मिळाले असते तर ती बचावली असती, असे त्यांनी म्हटले.