बीड : तूर खरेदीचा नेमक्या काय अडचणी आहेत, हे तपासण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट बीड जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रास भेट दिली, त्यांनी यावेळी थेट शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून, मुख्यमंत्री महोदय काहीही खरा पण शेतकऱ्यांची राहिलेली तूर खरेदी करा, अशी मागणी केली.
तसेच यावेळी सरकारने नियोजन चुकल्याचे म्हटले आहे, यावर नियोजन चुकल्याची कबुली कसली देता, नियोजन करता येत नसेल तर राजीनामे द्या, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.